LEH- Pangong Lake- BLUE PARADISE

Dr. Sujata Chougule
2 min readNov 9, 2021

लेह — पान्गोंक तलाव आणि खारदुंगा पास

लेह ला २ रात्र मुक्काम होता. १ ला दिवस pangong lake ला जायचे ठरवले. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे Traveler गाडी घेऊन जायचे ठरले. आम्ही एकूण १२ जण होतो त्यामुळे ते सोयीस्कर पडले.

रस्त्याची स्थिती अतिशय खराब होती आणि त्यात वळणदार उंचीवर जाणार रस्ता. मनातखुपदा येऊन गेले काशाला आलो त्यापेक्षा लेह फिरलो असतो तर बर झाले असते. जाताना अधून मधून मेंढ्यांचा कळप आणि याक चा कळप दिसत होते. मधेच एक छोटे नावापुरते गाव लागले. असा ४-५ तासाच्या प्रवासानंतर लांबून काहीसा निळा ठिपका दिसायला लागला. अशा वृक्ष परिसरामध्ये इतके निळे पाणी म्हणजे pangong ला finally पोहचलो. Oxygen लेवल कमी असल्यामुळे शांत पणे गडबड न करता हा परिसर पाहावा. नाहीतर डोके जड होते आणि मळमळू लागते.

दूरवर पसरलेले निळेशार पाणी , आजूबाजूला लालसर पांढरे डोंगर आणि वर फिकट निळे आकाश . आम्ही lucky होतो ज्यामुळे खूप सुंदर वातावरणामध्ये pangong चे दर्शन घेतले. कारण दुसर्या दिवशी snow fall झाला. आम्ही गेलेलो तेंव्हा लक्ख सूर्यप्रकाशात पण थंडी वाजत होती, snow fall सुरु असताना तेथील थंडीची कल्पनाच करवत नाही.

Pangong तलाव हा भारत आणि तिबेट च्या border वर येतो. आणि जुन्या काळी हा तलाव indus नदीचा भाग होता. या तलावा भोवती white वाळूचे वाळवंट दिसते. असेच वाळवंट नुब्रा valley मध्ये पण दिसून येते.

येथे राहण्यासाठी जेवणासाठी सोयी भरपूर आणि चांगल्या आहेत. आम्ही तेथे न राहता परत लेह ला आलो. पण २-३ तास स्वप्नात असल्यासारखे गेले.

लेह ला रात्री पोहचलो, वाटेमध्ये प्रचंड थंडी आणि सुर्यास्ताचा अनोखा नजराणा अनुभवत प्रवास केला. पण याहून सुंदर journey आमची वाट पाहत होती. पुढील २-४ दिवस अनोखा प्रवास होणार होता.

--

--

Dr. Sujata Chougule

Hi, I am homeopathy consultant, yoga instructor and health blogger. I like to share my thoughts and encourage people for better mental and physical wellbeing.